Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

गुहागर : गुहागरात कासवाची १०८ पिल्ले समुद्राकडे झेपावली

banner 468x60

कासव संवर्धनासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, गुहागर समुद्रकिनाऱ्यावर १०० घरटी संरक्षित करण्यात आली आहेत.

banner 728x90 banner 728x90

या संरक्षित घरट्यांमधून गेल्या तीन दिवसात कासवांच्या १०८ पिल्लांना वन विभागामार्फत समुद्रात साेडण्यात आले.
याबाबत वनपाल संतोष परशेटे यांनी सांगितले की, गुहागर बाग व गुहागर वरचापाट येथे समुद्रकिनारी सापडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या १०० घरट्यांमधून १०,५३८ अंडी येथील कासव अंडी संरक्षण केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली आहेत.

समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ रोजी सापडलेल्या पहिल्या घरट्यातून ४ फेब्रुवारीला १, ५ फेब्रुवारीला ४ व ६ फेब्रुवारी १०३ अशी एकूण १०८ पिल्ले सुरक्षित समुद्रात सोडण्यात आली. मे महिन्यापर्यंत या घरट्यातून कासवांची अनेक पिल्ले टप्प्याटप्प्याने बाहेर पडत राहतील,

असे वनपाल परशेट्ये यांनी सांगितले. गुहागर समुद्रकिनारी कासवाची पिल्ले समुद्रात साेडताना गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, रानवीचे वनरक्षक अरविंद मांडवकर, अडूरचे वनरक्षक संजय दुंडगे, कासव मित्र देवेश परशेट्ये, सत्यवान घाडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *