Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

गुहागर : समुद्रकिनारी आढळला मृत डॉल्फिन मासा

banner 468x60

गुहागर समुद्रकिनारी रविवारी सकाळी मृतावस्थेत डाॅल्फिन मासा आढळला. हा मासा चार ते पाच फूट लांबीचा असून, गुहागर नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावरच खाेल खड्डा खणून माशाला पुरले.

banner 728x90 banner 728x90


गुहागर नगरपंचायतीचे लाइफ गार्ड अक्षय लोखंडे रविवारी सकाळी आठ वाजता गुहागर समुद्रकिनारी कामासाठी हजर झाले हाेते.

त्यांनी रात्री उशिरा समुद्रातून वाहून आलेला चार ते पाच फूट लांबीचा डॉल्फिन मासा समुद्रकिनारी मृतावस्थेत असल्याचे पाहिले. त्यांनी गुहागर नगर पंचायतीचे सुनील नवजेकर यांना याविषयी माहिती दिली.

त्यानंतर या मृत माशामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू नये यासाठी त्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याचे ठरविले. गुहागर नगरपंचायतीचे गणेश पावसकर, समर्थ भोसले, राजन परकर यांनी समुद्रकिनारी खोल खड्डा खणून त्यामध्ये डॉल्फिन माशाला पुरून त्याची विल्हेवाट लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *