गुहागर : मनसेच्या इशाऱ्यानंतर रस्ता दुरुस्ती सुरू

banner 468x60

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातास कारणीभूत ठरणारे खड्डे तत्काळ भरावेत यासाठी गुहागर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अधिकारी यांना खड्डे न भरल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

यानंतर आता शासकीय विश्रामगृह ते गुहागर शहरापर्यंतच्या मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांना लेखी निवेदनातून सदर खड्डे तत्काळ भरले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

अनेक दिवस या मार्गावरील खड्डे धोकादायक ठरत होते. गुहागर कीर्तनवाडी, गुहागर, शृंगारतळी, पालपेणे फाटा येथील पूल, रामपूर, तांबी, पाचाड, गणेशखिंड अशा ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.


याबाबत जानवळकर यांनी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आता रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

तसेच शृंगारतळी बाजारपेठेतील बाजार पुलावरील रस्त्याची दुरुस्तीही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी, जानवळे शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *