शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून १ महिन्यात दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखवून २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार गुहागरात घडला आहे.
या प्रकरणी खेडमधील प्रौढाच्या विरोधात गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश भागोजी सणस (३२, रा. मांडवे, ता. खेड) असे त्याचे नाव आहे.
या फसवणुकीबाबत प्रतीश शंभू राजपुरे (रा. गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार हा प्रकार गुहागर येथील वरचापाट दुर्गादेवीवाडी येथे ८ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. नरेश भागोजी सणस यांनी प्रतीश शंभू राजपुरे यांच्याशी फोनद्वारे
संपर्कात राहून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवून १ महिन्यात दुप्पट परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून २१ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते. मात्र, नरेश सणस याने दिलेली मुदत संपूनही अद्यापपर्यंत ठरल्याप्रमाणे रकमेचा परतावा अथवा रक्कम दिलेली नाही.
या प्रकरणी गुहागर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















