दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडीतील एका विवाहितेने आपल्या पोटच्या 2 वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना दापोलीत घडलीय .
27 वर्षीय सीया सूरज म्हाब्दी हिने आपल्या दोन वर्ष दोन महिन्याचा मुलगा समर याच्यासह आज शुक्रवार दिनांक २८ जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय. दरम्यान आत्महतेचं कारण अस्पष्ट आहे.
याबाबत दापोली पोलीस अधिकचा तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज घरातील सर्व मंडळी घरच्या कामाला लागली होती. मात्र काही वेळानंतर घरीतील सीया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांचे लक्षात आले.यानंतर शोधाशोध सुरू झाली.
मात्र कुठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.ही नोंद सुरू असतानाच विहीरीच्या काठावर चप्पल असल्याचे आढळून आले.
शंका बळावल्याने विहिरीत शोध घेतला असता माय लेकराचे मृतदेह आढळून आला ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून पंचनामा होऊन शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
पण तुम्हाला कसं माहीत की आत्महत्या आहे, तुम्हाला पूर्ण माहिती माहीत आहे का??
विनंती आहे पूर्ण माहिती पडताळून पहा.
जेणेकरून त्या दोघांना न्याय मिळेल. जी आई आपल्या मुलासाठीच जगत होती ती त्याच्यासोबत जीव देणं शक्य नाही.
आपलं म्हणणं आम्ह्याला मान्य आहे… पण अश्या बातम्यांमध्ये आम्ही थेट भूमिका घेऊ शकत नाही जोपर्यंत आम्ह्याला पूर्ण माहिती मिळत नाही घटना शुक्रवारी घडली आहे . घटनेला अनेक कंगोरे असू शकतात. प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत असते. जोपर्यंत पोलिसांचा तपास किंवा त्यांच्या घरच्याचं याबाबत कोणतीही माहिती येत नाही तोपर्यंत आम्हीही दुसरा कोणताही निष्कर्ष काढू शकत नाही. त्यांनी आत्महत्या का केली कौटुंबीक छळ आहे का की वेगळं कारण याबाबतचा पुरावा मिळू शकत नाही तोपर्यंत आम्हीही अश्या बातम्यांमध्ये ठोकताळे मांडू शकत नाही. पण या बातमीला आम्ही पूर्ण न्याय देऊ. ज्या पध्दतीने आम्ही सायली नागे मृत्यू प्रकरणात भूमिका घेतली. – कोकण कट्टा न्युज
बरोबर आहे तूमचा पण जर पोलिसांनी कसून चौकशी केली तर त्यांच्या बऱ्याचं गोष्टीं समोर येतील..तुम्हाला पंचनामा मध्ये काय आहे यातल काही समोर आलं का??