दापोली : दुःखद उपजिल्हा रुग्णालयात 9 महिन्याच्या गरोदर मातेचा मृत्यू

सायली सनी नागे 28 वर्ष

banner 468x60

दापोली तालुक्यातील गरोदर महिला आणि बाळाला वाचवण्यात दापोली उपजिल्हा रुग्णालयाला अपयश आलेलं आहे. सायली सनी नागे 28 वर्ष तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

banner 728x90

दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्याने आज सिजर करून बाळाला जन्म दिला जाणार होता . मात्र त्यापूर्वीच श्वासाचा त्रास होऊ लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले मात्र त्यांचे प्रयत्न तिचा जीव वाचू शकले नाही. दोन दिवसांपूर्वी सायली उपजिल्हा रुग्णालयात येऊन सुद्धा तिला योग्य उपचार न मिळाल्याने तिचा बळी गेला का?

अशी चर्चा दापोलीत सुरू झालीय. सायलीला तीन वर्षाची एक लहान मुलगी आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *