सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात राजकीय व जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागु करण्यात आले आहेत.
अप्पर जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशात काय म्हटलंय
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांजकडील जावक क्रमांक जिविशा/मनाई आदेश/525/2024 दिनांक 24/01/2024 रोजीचे पत्र या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे.
सदर पत्राव्दारे त्यांनी सध्या सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन राज्यात जातीय तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्हयात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकातील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. 66 चे काम पुर्ण न झाल्याचे निषेधार्य आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत.
अशावेळी आंदोलनकत्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा च सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि.26/01/2024 रोजी पूजासताक दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित देखील ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे असे आमचे मत झाले आहे.
त्यामुळे रत्नागिरी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता दि. 25/01/2024 रोजी 00:01 वाजता पासून ते दि. 08/02/2024 चे 24:00 वा. पर्यत संपूर्ण रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलन 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी होणेस विनंती केली आहे.
वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत माझी खात्री झाली आहे. त्याअर्थी, मी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार आदेश करतो की दि. 25/01/2024 रोजी 00:01 वाजता पासून ते दि. 08/02/2024 चे 24:00 वा. पर्यत संपूर्ण रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पोलीस
अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.
अ) शारीरीक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे लाठया अगर
कोणतीही वस्तू घेवून फिरणे.
ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. क) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा
तयार करणे
3) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे,
इ) इसम अगर पेते किंवा आकृती यांच्या पतिमा यांचे प्रदर्शन करणे.
फ) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वादय वाजविणे.
ग) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
मी असेही जाहीर करतो की, उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बार्बीकरिता लागू होणार नाहीत, 1) अंत्ययात्रा
2) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी
3) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी
4) सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी
प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक 24/01/2024 रोजी दिला.
मा. जिल्हादंडाधिकारी महोदय यांचे मान्यतेने

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















