दापोली तालुक्यातील जालगाव वळणे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर काही कामासाठी 3 दिवसांपूर्वी दाभोळ रोड वरून दापोलीकडे येत असता त्यांना जालगाव व वळणे गावच्या हद्दीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचे त्यांनी पत्रकाराना बोलताना सांगितले.
रात्री गाडीच्या प्रकाशझोतात बिबट्या रस्ता ओलांडताना दिसला.
त्यांनी गाडी थांबवून बिबट्याला जाऊ दिले. हा बिबट्या असल्याने आणि परिसरात ग्रामस्थांचा रहिवास, वर्दळ असल्याने वनविभागाने या बिबट्याला पकडून सुरक्षित अधिवासात सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















