दापोली : आगारातील काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी

banner 468x60

दापोली आगारात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या कामामुळे गाड्यांची वाहतूक ही बसस्थानकाच्या मागील बाजूकडून आझाद मैदानाचे बाजूने होत आहे.

तेथे असलेल्या अपुऱ्या जागेमुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्याचा परिणाम बसच्या वेळापत्रकावरदेखील होत असून, अनेक बसगाड्या उशिराने धावत आहेत. धुळीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

banner 728x90 banner 728x90

हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवांशामधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *