दाभोळ : आपापसातील वादातून मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील कोळथरे येथे मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी १८ मेला घडलीय.


कोळथरे येथील विशाल शशिकांत मयेकर (वय वर्ष ३९) याची वादातून झालेल्या मारहाणीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. विशाल शशिकांत मयेकर (39) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोळथरे मोहल्ला येथे ही हत्या झाली आहे. शशीभूषण सनकुळकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे. आपापसातील वादामुळे ही हत्या झाली आहे.

मयत विशाल शशिकांत मयेकर आणि त्याचा मित्र शशिभुशण शांताराम सणकुळकर आणि मनोज प्रभाकर आरेकर हे तिघेजण मित्र आहेत. नेहमीप्रमाणे कामाला जायला निघाले असताना हा वाद झाला असून वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

यावेळी हे तिघेही दारू पित असल्याची माहिती आहे. मात्र संशयीत आरोपी हा अद्याप पोलीसांना मिळाला नसून त्याचा कसून दाभोळ पोलीस शोध घेत आहेत. दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पंचनदी गावा नजीक कोळथळे हा गाव समुद्रकिनारी वसला आहे.

https://youtu.be/Qm79kvzF4Mw

खूनाच्या प्रकाराने संपूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे. दाभोळ सागरी पोलीसांनी दिलेल्या आणि घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विशाल शशिकांत मयेकर हा त्याचा मित्र शशिभूषण शांताराम सनसुळकर रा. कोळथरे, मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासोबत नेहमी मोलमजुरी करण्याकरीता जात असे.

त्यांची चांगली मैत्री देखील होती. त्यांचे नेहमी एकत्र काम व एकत्र बसणे उठणे असायचे. तसेच ते नेहमी एकत्र बसून सोबत दारू देखील पीत असत. शशिभूषण शांताराम सनकुळकर हा कोणत्या ना कोणत्यातरी कारणावरून होत असलेल्या वादातूनच दारूच्या नशेत एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण करीत असे.

18 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोळथरे मोहल्ला येथे मित्र शशिभूषण सनकुळकर याने शुल्लक कारणावरून विशाल मयेकर रा. पंचनदी, निमुर्डेवाडी याला कोणत्यातरी अवजड वस्तुने हत्याराने मारले.

या मारहाणीत रक्तस्त्राव होवून त्याचा मृत्यू झालाय. या घटनेची विशाल मयेकर याचा भाऊ व रिक्षा चालक अमित मयेकर यांनी दाभोळ सागरी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दाभोळ सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *