अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मंगळवारी रत्नागिरीसह दापोली,खेड, चिपळूण आणि राजापुरात समाजबांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालंय.
व्हॉट्सअप ग्रुप जॉइन कोकण कट्टा लाईव्ह
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
पोस्ट टाकणाऱ्या चारहीजणांनी जमावासमोर माफी मागितल्यानंतर जमाव पांगला. निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आज २४ जानेवारी सायंकाळी शांतता कमिटीच्या बैठकीनंतर दोन गटात वाद पुन्हा वाद झाल्याने तणाव निर्माण झाला आहे.
शांतता कमिटीच्या बैठकीला दोन्ही गटाचे समाजबांधव एकत्र होते मात्र काही विषयावरून दोन गटात वाद झाल्याने परिस्थिति चिघळली होती. दरम्यान परिस्थिती आता नियंत्रणात आहे ,दापोलीत सध्या कुठेही वाद नाहीय.
डीवायएसपी सचिन माईनकर ही बैठक सुरु होती. दरम्यान दापोली पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं आहे.
राज्यातील विविध शहरात सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस Police अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर (Sociala Media) प्रसारित करु नये, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केले आहे.
त्याचबरोबर पोलिसांकडून दापोलीकरांना खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे.
सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये.
तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















