दापोली : अनधिकृत वाहतूक करणारा वाळूचा डंपर पकडला

banner 468x60

दापोली शहरात अनधिकृत रित्या वाळू वाहतूक करणारा डंपर पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन ब्रास वाळू विनापरवाना वाहतूक करण्यात येत होती यावेळी दापोलीचे तलाठी गुरुदत्त लोहार यांनी पकडून याची माहिती मंडळ अधिकारी सुदर्शन खानविलकर यांना दिली.

प्रतिकात्मक फोटो

30 ऑक्टोबर रोजी सोमवारी दुपारी साडेबारा वा.च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. दापोली शहरातील मेहता पेट्रोल पंपाजवळ हा दोन ब्रास वाळू भरून वाहतूक करणारा डंपर पकडला आहे.

banner 728x90 banner 728x90

डंपर चालक परवेज मुजफ्फर सरखोत यांचा डंपर व वाळू दापोली तहसीलदारांनी जप्त करून तहसीलदार कार्यालयात आणून ठेवले आहे. या सगळ्या प्रकरणाचा पंचनामा महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना सादर केला आहे.

दोन ब्रास वाळू वाहतुकी प्रकरणाला एक लाख व अनधिकृतपणे वाहनातून केल्यामुळे एक लाख असा एकूण सुमारे दोन लाख रुपये दंड करण्यात आला आहे.

हा दंड भरल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती दापोली तहसीलदार अर्चना घोलप बोंबे दिली आहे. अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर क्रमांक MH 46 F 7905 या वाहनातून दापोली तालुक्यातील अडखळ येथून ही वाळू दापोली येथे आणली जात होती याचवेळी हा डंपर पकडण्यात आला आहे.

यावेळी डंपर चालकाकडे वाहतुक पास पावती नसल्याने 30 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा च्या सुमारास ही वाळू वाहतुक पूर्णपणे अनधिकृत असल्याची खात्री झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी केलेल्या पंचानाम्यात अडखळ येथील प्लॉटवरून ही वाळू आणल्याच मान्य केले असून परवेज मुजफ्फर सरखोत यानेच ही पंचनामा करताना तलाठ्यांना दिली आहे. याप्रकरणी तलाठी गुरुदत्त लोहार यांनी तहसीलदार कार्यालयात पंचनामा सादर केला आहे आता पुढील कार्यवाही तहसीलदार अर्चना बोंबे, निवासी नायब तहसीलदार आडमुठे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *