दापोली पंचायत समितीकडे उंबरशेत व केळशी या गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दापोली तालुक्यात काही गावांना वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. दापोली शहराला देखील दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे.
तालुक्यातील उंबरशेत व केळशी या दोन गावांनी पाण्याच्या टँकरची मागणी पं. स. कडे केली आहे. एप्रिल महिन्यात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील काही गावांमध्ये वस्त्यांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन, साठवण टाक्यांमुळे पाण्याची समस्या उद्भवलेली नाही.
परंतु काही गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी पत्र आता पंचायत समितीकडे येत असल्याने पाणी टंचाईच्या झळा बसण्यास ग्रामस्थांना सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















