चिपळूण : रोझमिन वांगडे हिने कॅलिफोर्नियामधील गोल्डन गेट युनिव्हर्सिटीमधून मिळवली मास्टर ऑफ सायन्स पदवी

रोझमिन वांगडे हिने कॅलिफोर्नियामधील गोल्डन गेट युनिव्हर्सिटीमधून मिळवली मास्टर ऑफ सायन्स पदवी

banner 468x60

ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, प्रिन्स्टन युरोप आणि अमेरिकेतल्या अशा मोठ्य विद्यापीठांत जाऊन शिकणं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. चिपळूण तालुक्यातील रोझमिन वांगडे हिने मात्र हे स्वप्न पूर्ण केलं आहे. कमी वयात रोझमिन वांगडे हिने कॅलिफोर्नियामधील गोल्डन गेट युनिव्हर्सिटी सॅन फ्रान्सिस्कोमधील ॲडव्हान्स अकाउंटिंग डेटा आणि ॲनालिटिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली आहे.

चिपळूण तालुक्यात रोझमिन वांगडे ही पदवी मिळवणारी पहिलीच ठरली असून 4 GPA, रँक, टॉपरसह पुरस्कार देखिल प्राप्त केला आहे. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून तिचं नाव या युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं जातं.

सध्या रोझमिन वांगडे ही वित्त बेक्टोन डिकिन्सन इंटीएनएल सॅन फ्रान्सिस्को येथे वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करतात. रोझमिन वांगडे ही चिपळूणमधील शैक्षणिक क्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि चिपळूण मुस्लीम समाज संस्थेचे मार्गदर्शक, महाराष्ट्र स्कुलचे चेअरमन अब्दुल रौफ वांगडे यांची मुलगी आहे.

चिपळूण शहरातून जाऊन एका मोठ्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमधून टॉप करण्याचं काम रोझमिन वांगडे हिने केलंय. खरंतर रोझमिन वांगडे हिने कोकणातील अनेक मुलींना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे.

शिक्षणामुळे सर्व काही साध्य करता येतं हेच रोझमीनच्या प्रवासातून पाहायला मिळत आहे. मुस्लीम समाजातील मुलींसाठी रोझमिन ही आदर्श आहे. आपलं गाव तालुका कोकण भागापुरतं मर्यदित न राहता आज तिने या यशाला गवसणी घातली आहे.

शिक्षण हे फक्त मुलांपुरतं मर्यादित न ठेवता त्याची जोड मुलींना ही देण्याची गरज आहे आणि हे केल्यास आपल्या कोकणात अश्या अनेक रोझमिन वांगडे पुढे येथील ही आशा आहे. विशेष म्हणजे या यशामागे रोझमिनच्या आईवडिलांचा ही तितकाच हात आणि सहकार्य आहे.

अब्दुल रौफ वांगडे यांनी केलेल्या प्रयत्नांतून रोझमिनने हे यश संपादन केलं आहे. परदेशामध्ये शिक्षण पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरातुन तिचं कौतुक होत आहे. कोकण कट्टा लाईव्ह न्युज कडूनही रोझमिन वांगडे यांना शुभेच्छा.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *