Breaking News

चिपळुण : भटक्या श्वानांचा उच्छाद, प्रशासनाचं दुर्लक्ष

banner 468x60

शहरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी निदर्शनास येत असून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय मुलांवर हल्ले करणे, पाठी लागणे, वाहनांचा पाठलाग करण्याचे प्रकार सतत घडत आहे.

banner 728x90 banner 728x90

त्यामुळे शहरातील राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी थेट पालिकेत धाव घेऊन भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.चिपळूण शहरात कुत्र्यांचा त्रास हा नवीन विषय नाही.

हजारो कुत्र्यांची नसबंदी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले; परंतु कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. गेले काही दिवस हा त्रास वाढला आहे. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या भटक्या कुत्र्यांची मजल गेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत.

याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शशिकांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिक संघ, परिमल ग्रुप, राष्ट्रवादी शरद पवार महिला व राष्ट्रवादी अजित पवार महिला पदाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.

तसे लेखी निवेदन दिले. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी याबाबत तातडीने कोणती उपाययोजना करता येईल यासाठी प्रयत्न करू. आठ दिवसात त्या बाबतीत योग्य ती यंत्रणा कार्यरत करून हा त्रास कमी केला जाईल, असे सांगितले.

या वेळी बाळा कदम, उस्मांन बांगी, रतन पवार, प्रकाश आंबुर्ले, वीणा परंजपे, रत्नाकर थत्ते, मगेश गोंधळेकर, अंजली कदम, आदिती देशपांडे, स्नेहल चव्हाण, भैय्या कदम, संतोष पवार, विकी नरळकर, कादिर मुकादम, पार्थ जागुष्टे, प्रशांत मुळे, सुनील खेडेकर, ओंकार गायकवाड, मनोज पांचाळ, माधवी भागवत, रूही खेडेकर, उदय वेल्हाळ, उदय ओतारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *