चिपळूण बस स्थानकातून 4 वाजता सुटलेली चिपळूण पेवे पांगारी एसटी बस पेवे आमशेत भोईवाडी येथे रस्त्याच्या एका साईडला कलंड ल्यामुळे बस मध्ये असणार्या 6 प्रवाशांपैकी विसापूर मधील दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या.
या महिलांना तळवली आरोग्य उपकेंद्रामध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले आहे. पावसाळा सुरू असून साईड पट्ट्याही धोकादायक झाल्या आहेत. खेडेगावातील रस्ते हे अरुंद आहेत त्यात पावसाळा सुरू आहे समोरून किंवा मागून कोणतेही वाहन आले नसतानासुद्धा चालकाने एसटी रस्त्याच्या कडेला का नेली हा एक प्रश्न निर्माण झाला आहे
.त्याच्या ह्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडताना टळली असली तरी दोन प्रवासी महिला मात्र यामध्ये किरकोळ जखमी झाल्या. या अपघाताची तात्काळ दखल घेत गुहागरच्या तहसीलदार परीक्षीत पाटील तसेच गुहागरच्या एसटी आगर प्रमुख श्रीमती कांबळे, ग्रामसेवक गोरे, तलाठी सोनार तातडीने घटनास्थळी दखल झाले.
प्रशासनाकडून तात्काळ एसटी बाहेर काढण्याच्या हालचाली केल्या आहेत तसेच जखमींना दवाखान्यातून उपचार करून त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















