चिपळूण : Video: कोकण रेल्वेच्या स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

banner 468x60

रत्नागिरी कोकण रेल्वेच्या एका स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्याचा वडापावच्या ट्रे वर पाय ठेवून झोपण्याचा प्रकार ताजा असताना येथे एक असाच किळसवाणा प्रकार दुसऱ्या

एका विक्रेत्याकडून घडला आहे. याबाबतचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

banner 728x90

चिपळूण स्थानकावर एका विक्रेत्याच्या हातातून भज्यांच्या ट्रे निसटला आणि सर्व भजी जमिनीवर पडली. त्या विक्रेत्याने सर्व भजी पुन्हा त्या ट्रे मधून भरली आणि विकायला पुन्हा निघाला असे त्या विडिओ मध्ये दिसत आहे. एका प्रवाशाने हा विडिओ चित्रित केला आहे.

हेही वाचा- गणपतीपुळे येथे सुरु होणार देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

या प्रकारांमुळे सामान्य लोकांच्या आरोग्याचे या विक्रेत्यांना काहीच देणेघेणे नाही हे समोर येत आहे. प्रवासात लहान मुले अशा खाद्यपदार्थाचा नेहमीच आग्रह धरतात. मात्र अशा प्रकारांमुळे हे पदार्थ मुलांना द्यावेत की न द्यावेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तो विक्रेता खरोखरच ‘ती’ भजी फेकून देणार होता का?

पडलेली भजी भरून झाल्यावर तो विक्रेता तिथून निघाला; मात्र जागरूक प्रवाशांनी त्याला हटकले आणि ती भजी टाकून देणार आहे की नाही ते विचारले,

तेव्हा तो विक्रेता हो बोलून पुढे चालायला लागला. मात्र तेथील प्रवाशांनी आरपीएफ कर्मचा-याच्या मदतीने तियेच जवळ असलेल्या कचराकुंडीत ती भजी फेकायला लावलीत. जर त्या विक्रेत्याला भजी फेकायचीच होती तर ती त्याने तिथेच बाजूला असलेल्या कचराकुंडीत न फेकता पुढे का घेऊन गेला? हा प्रश्न समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *