खेड : पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात

Screenshot

banner 468x60

खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील वळणावर दापोलीहून चिपळूणला जाणाऱ्या कारने पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या गाडीला धडक देवून अपघात केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.

अपघातात कोणालाही दुखापती झाल्या नसल्या तरी दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.

पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते हे चालकासमवेत बोलेरो (एम.एच.08/ए.एक्स. 3809) घेवून खेड येथून दापोलीला जात होते. यादरम्यान, दापोलीहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने व्हॅनवर आदळला. अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *