खेड : एम.ई.एस.ए.एम. परशुराम रुग्णालयात ‘Cardiac Emergencies’ विषयावर CME कार्यक्रम

banner 468x60

रत्नागिरी येथील प्रसिद्ध असलेल्या खेड घाणेखुंट येथे एम.ई.एस. ए.एम. परशुराम रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी Industrial Medical Association (IMA) लोटे–लवेल येथील डॉक्टरांसाठी Continuous Medical Education (CME) चे आयोजन करण्यात आलं.

banner 728x90


कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रणव शामराज, तसेच परशुराम रुग्णालयाचे फिजिशियन डॉ. भीमराव पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून IMA लोटे–लवेलचे अध्यक्ष डॉ. अनिल शिगवण यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

डॉ. प्रणव शामराज यांनी ‘Cardiac Emergencies & Their Golden Hour Treatment’ या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयातील नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक विभागांबाबत – Intensive Care Unit (ICU), सोनोग्राफी, फेको सर्जरी, किडनी स्टोन, ऑर्थोपेडिक सर्जरी – यांची माहिती वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अनुपम अलमान यांनी सादर केली.

रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेत वैद्यकीय अधीक्षक व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन उत्पात यांनी मान्यवरांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

IMA अध्यक्ष डॉ. अनिल शिगवण यांनी या उपक्रमाबद्दल रुग्णालय प्रशासनाचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास एकूण २८ IMA डॉक्टरांनी उपस्थित राहून परशुराम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *