Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

खेड : किरकोळ कारणावरून प्रौढाला बेदम मारहाण

banner 468x60

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ५३ वर्षीय प्रौढास लोखंडी वस्तूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना खोपी (ता. खेड) येथे घडली. या प्रकरणी दोघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


सुनील आत्माराम भोसले (वय ५३, रा. मिरले हुंबरवाडी) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना ११ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास खोपी येथील रोहिदास वाडी पुलाजवळ घडली. फिर्यादी भोसले हे पायी चालत जात असताना आरोपी दिनेश वासुदेव सुतार (रा. मिरले, वडाची वाडी) याने पैशाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.

वादावादी दरम्यान, “तुझ्या मोठ्या भावाला जाग्यावर बसवले आहे, तसेच तुलाही बसवेन,” अशा धमकीवजा शब्दांत आरोपीने बोलत भोसले यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जोरदार मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या साथीदारासह संगनमताने रस्त्यावर पाडून लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता, “पनवेलला नेऊन ठार मारतो,” अशी धमकीही त्यांनी दिली. या हल्ल्यात भोसले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खेड पोलिसांनी दिनेश सुतार व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *