खेड : इंस्टावर पोस्ट शेअर करत तरुणाने संपवले जीवन, व्हिडिओत सदानंद कदम यांचं नाव

banner 468x60

मुंबईम मालाडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दोन दिवस अगोदरच एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रेश तिवारी असं या जीवन संपवलेल्या व्यक्तीचं नाव आहे. विशेष म्हणजे चंद्रशे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याध्ये, आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बंधुचं नाव घेतलंय. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस (police) अधिक तपास करत आहेत.

चंद्रेश तिवारी यांनी व्हिडिओतून कदम यांचं नाव घेत पोस्ट केलीय. पोस्टमध्ये आत्महत्येस रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यासह आणखी दोघांची नावे घेत त्यांना जबाबदार ठरविण्यात आलंय.

सदानंद कदम यांनी मुंबईत इतर कोणत्याही कंपनीत काम करू देणार नाही, असा इशारा चंद्रेश याला दिला होता. याप्रकरणी, चंद्रेशचा भाऊ पावन तिवारी यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सदानंद कदम यांच्यासह धमकी देणाऱ्या आणखी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, यातील आरोपी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम देखील आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. सध्या पोलिसांकडून खेडमध्ये शोध मोहीम सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *