खेड : गुटख्यासह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळनजीक रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 74 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

banner 728x90

पाच लाख रुपये किमतीच्या सुझुकी कारसह फरहान फाख मोहम्मद पटेल (37, रा. गोवळकोट रोड, पेठमाप – चिपळूण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

फरहान पटेल हा मारूती सुझुकी झेन इस्टिलो कारमधून (एम.एच.-02/बी.जे.-3329) गुटख्याची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच दाभिळनजीक पोलिसांनी सापळा रचला.

या मार्गावरून मारूती सुझुकी कार जात असताना पथकाने कार अडवून तपासणी केली. या तपासणीत गुटख्याच्या 17 पोत्यांमध्ये प्रत्येकी 22 पाकिटे असा एकूण 74 हजार 52 रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. याशिवाय पाच लाख रुपये किंमतीची सुझुकी कारही जफ्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *