खेड : घरात शिरून तिघांना मारहाण, 15 जणांवर गुन्हा दाखल

banner 468x60

खेड येथे आयनी मेटे येथील घरात शिरून शिवीगाळ करत तिघांना मारहाण केल्याप्रकरणी प्रथमेश एकनाथ जाधव (रा. आयनी मेटे-मोहल्ला) याच्यासह 12 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रकाश भागोजी जाधव (44), लक्ष्मी प्रकाश जाधव (40), दिफ्ती प्रकाश जाधव (सर्व रा. आयनी मेटे-मोहल्ला) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण घरी टीव्ही पाहत असताना घरावर कोणीतरी दगड मारत होते.

फिर्यादी पत्नी दरवाजा उघडून पाहण्यासाठी बाहेर आली असता प्रथमेश जाधव व अन्य 12 ते 15 जण हातात हॉकी स्टीक घेवून घरात शिरले. सर्वांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *