खेड : चोरीची वाळू आणि कोऱ्या नंबर प्लेट

banner 468x60

चोरीची वाळू आणि कोऱ्या नंबर प्लेट असलेले डंपर खेडमध्ये धावत आहेत. खेड तालुक्यातील बहिरवली मार्गावर गेल्या अनेक महिन्यापासून चोरटी वाळू विना परवाना उत्खन केलेली चिऱ्याचे डंपर धावत आहेत.

वेगाने जाणाऱ्या डंपर मुळे अनेक वेळेला लहान-मोठे अपघात होत आहेत. विशेष म्हणजे हे डंपर विनानंबर प्लेटचे असताना देखील वाहतूक अधिकारी त्यावर कारवाई करत नसल्याने शासकीय अधिकारी प्रशासन खरोखर सुस्त झालीय की राजकीय वरदहस्त असल्याने दुर्लक्ष करत आहे, अशी चर्चा सध्या खेडमध्ये सुरु आहेत.

खेडच्या खाडीपट्टा भागात अवजड वाहतूक करणाऱ्या डंपरवर कोणतेच प्लेट नंबर दिसून येत नाही व लावले गेलेले नाही. त्यामुळे अपघात करून वाहन पळून जाण्यास अनेक वेळा हे डंपर चालक यशस्वीहोत आहेत भर पावसाळा कालावधीमध्ये दाभोळ व वाशिष्ठी खाडीतून जगबुडी खाडीतून सक्शनच्या पंपाद्वारे दिवस रात्र वाळू काढली जात होती आणि डंपरमध्ये भरून विना रॉयल्टी तिची वाहतूक होत आहे.

दरम्यान , चिरे व्यावसायिकांनी देखील विनापरवाना दिवाळी दसऱ्या यापूर्वीच चिऱ्याची खाणी सुरू केली आहेत. यांना कोणी परवानगी दिली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळू व चिऱ्याची यासाठी अनेक परप्रांतीय लोक येऊन या ठिकाणी काम करीत आहेत. मात्र, त्यांची शासनाच्या सरकारी दरबारी कोणतीच नोंद नसल्याने धक्कादायक बाब पुढे येत आहे.

काम करणारे कामगार हे बांगला देशी आहेत का याची चाचपणी न करता त्यांना कामावर ठेवण्यात आले आहे. या बाबत व्यावसायिकांना देणेघेणे नसल्याची बाब पुढे येत आहे. संबंधित वाळू व चिरे व्यावसायिकांना कुणाचाही धाक नसल्याचे उघड होत आहे.

सध्या हे असे प्रकार दापोली व खेड तालुक्यांमध्ये जोरदारपणे सुरू आहेत. या बाबीकडे मंडल अधिकारी व तलाठी सतत दुर्लक्ष करताना दिसत आहेत. याबाबत प्रशासन या वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *