खेड शहरातील मुक्कादम हायस्कूलसमोरील नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव कारने ३ वर्षांच्या चिमुरडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले अफताब अहमद खान (वय ३२, सध्या रा. मदिना चौक, खेड) यांची पत्नी आणि ३ वर्षांची मुलगी पलक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नदीकाठच्या रस्त्यावरून घरी परतत होत्या. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (क्र. एम.एच. ०५ डी.ई. ०४५८) लहानग्या पलकला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की पलक खाली पडली यामुळे पलकच्या पोटाला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातानंतर १० दिवसांनी म्हणजेच ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खेड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक महेश अवधूत कारळे (रा. हेडगेवार कॉलनी, ब्राह्मण आळी, खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा (रजि. नं. ४४/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















