खेड शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (३२, रा. भाईंदर-ठाणे) या तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.
तेव्हापासून सुप्रिया तणावाखाली होती आणि भावाच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
शहरातील कुंभारआळी येथील ग. म. पाटणे संकुलातील रुम नं. ३०२ मध्ये वास्तव्यास असलेल्या सुप्रिया वनशा हिने फ्लॅटमधील खोलीच्या छताला असलेल्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.
आत्महत्येपूर्वी लिहिलेली डायरी ठरली महत्त्वाची
सुप्रियाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीतून या घटनेमागील कारण समोर आले आहे. तिने डायरीत नमूद केले होते की, भावाने केलेल्या आत्महत्येचे दुःख तिला सहन होत नाहीये आणि त्या आत्महत्येपासून ती सतत तणावाखाली होती. हे दुःख असह्य झाल्यानेच ती आत्महत्या करत असल्याचे तिने लिहिले होते. यामुळे पोलीस तपासादरम्यान सुरू असलेल्या अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













