खेड : बांगलादेशी नागरिकाला घेतले ताब्यात

banner 468x60

खेड तालुक्यातील कळंबणी आपेडेफाटा हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर काम करताना आढळून आलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

banner 728x90


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ११ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३५ च्या सुमारास करण्यात आली. अकबर अबू शेख असे ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे.

अकबर अबू शेख (सध्या रा. कळंबणी, आपेडेफाटा, हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर, ता. खेड, मूळ गाव-पेडोली, तहसील-चौदलपुर, ठाणा अभयनगर, जिल्हा–जेशुर, ढाका, देश-बांगलादेश) हा बांगलादेशातील गरिबीस व उपासमारीस कंटाळून उदरनिर्वाहाकरीता भारताच्या

सरहद्दीवरील गस्ती पथकांची नजर चुकवून व मुलखी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारत देशात अवैध प्रवेश करून आला. तो चिपळूण तालुक्यातील कळंबणी हद्दीतील आपेडेफाटा, हॉटेल स्वामीलीला जवळील साईटवर काम करताना मिळून आला.
याबाबतची फिर्याद दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरीचे पोलीस हवालदार आशिष वसंत शेलार यांनी येथील पोलीस स्थानकात दिल्यानुसार, खेड पोलिसांनी ११ मार्च २०२५ रोजी रात्री ८.०५ वाजता बांगलादेशी नागरिक अकबर अबू शेख याच्याविरोधात भारतात प्रवेश अधिनियम १९५० चा नियम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ परि. ३ (१) (अ), परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *