खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचा विनयभंग करत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी रोशन धोत्रे (२८, रा. अलसुरे-बौद्धवाडी, खेड), सुरज सुरेश पाटील (१८, रा. भोस्ते खेड) या दोघांना येथील पोलिसांनी अटक केली.
दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२४ पासून आजतागायत घडल्याचे पीडित युवतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित युवतीशी ओळख झाल्यानंतर वर्षभरापासून त्यांचे बोलणे व गाठीभेटी सुरू होत्या. यादरम्यान, दोघांनीही विनयभंग करत अश्लिल वर्तन केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पीडित युवतीने रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघांवर विनयभंगासह ब्लॅकमेल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत रात्री उशिरा दोघांवर येथील पोलिसांनी अटकेची कारवाई केली.
या दोन्ही संशयितांचे मोबाईलही पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















