Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : रेल्वेतून पडून जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका ३५ वर्षीय प्रवाशाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत मिळून आलेल्या या प्रवाशाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याला वाचवण्यात यश आले नाही.

banner 728x90 banner 728x90

या घटनेची नोंद सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे करण्यात आली आहे. मृत प्रवाशाचे नाव अस्लम कासीम अली (वय ३५, रा. श्रीराम कॉलनी, करावलनगर, नॉर्थ ईस्ट दिल्ली) असे आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.२१ वाजण्यापूर्वी संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील रहिवासी असलेला अस्लम कासीम अली हा प्रवासादरम्यान रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. रेल्वे ट्रॅकजवळ तो जखमी अवस्थेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळून आला. कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, अस्लम अली यांना अधिक उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांना रात्री ८.०० वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, रात्री ८.४० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सिव्हील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयश माईन यांनी अस्लम कासीम अली यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद करण्यात आली असून, संगमेश्वर पोलीस ठाणे या अपघाती मृत्यूच्या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *