रत्नागिरीत बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी, 13 बांगलादेशी नागरिकांना अटक

banner 468x60

कोकणात पुन्हा एकदा बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी झाल्याचं समोर आलं आहे. चिरेखणीवर काम करणाऱ्या एकूण १३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मंगवारी १२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारू धंदे, वाहनांची चेक नाक्यांवर तपासणी सुरू आहे. या सगळ्यावर प्रशासनाची करडी नजर असतानाच आता बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा समोर आला आहे.

या सगळ्यांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. जून २०२४ पासून ते आजपर्यंत हे बांगलादेशी नागरिक आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ यांचे चिरेखणीवर कालरकोंडवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांच्याकडे कामाला होते.

याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. यावरुन मोठी कारवाई करण्यात आली आहे.

  • वहीद रियाज सरदार (वय ३५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, बांगलादेश,
  • रिजाऊल हुसेन करीकर (५० वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, राज्य ढाका, बांगलादेश,
  • शरिफुल हौजीआर सरदार (२८ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, बांगलादेश,
  • फारुख मंहमद जहीरअली मुल्ला (५० वर्षे, रा. ठाणा शरशा, तहसिल कैबा, जि. जसोर, बांगलादेश,
  • हमिद मुस्तफा मुल्ला (४५ वर्षे, रा. तहसिल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, बांगलादेश,
  • राजू अहमद हजरतअली शेख (३१ वर्षे, रा. तहसिल सागरदरी, जि. जेसोर, ठाणा केशबपुर, राज्य ढाका, बांगलादेश,
  • बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार वरा (२९ वर्षे रा. तहसिल कलारोवा, जि. सान कलारोवा, बांगलादेश,
  • सैदुर रेहमान मोबारक अली (रा. पसल कलारोवा, जि. सातखिरा, राज्य ढाका, ठाणा कलारोवा, बांगलादेश,
  • आलमगिर हुसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (३४ वर्षे, रा. पाईकपरा, पोस्ट कामाराली, जि. साथखिरा, बांगलादेश,
  • मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार, (३२ वर्षे, रा. गांव बोरुदाबाक्शा, जि. सातखिरा, तहसिल कलारोवा, राज्य ढाका, बांगलादेश,
  • मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (३८ वर्षे, रा. बाशबरी, जि. जसोर, ठाण केशबपुर, बांगलादेश,
  • मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (४५ वर्षे, रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, बांगलादेश,
  • मोहम्मद लालटु मोंडल (३७ रा. बराली, ठाणा कलाराव, जि. सातखिरा, बांगलादेश, या सर्वांचा यामध्ये समावेश असून हे भारतामध्ये अनधिकृतरित्या राहत होते हे स्पष्ट झालं आहे.
    बांगलादेशी नागरिक असतानाही ते कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय ते भारतात राहत होते.
  • तसेच भारत – बांग्लादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करून राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व १३ जणांना ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
  • या सर्व बांगलादेशी नागरिकांची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हे नागरिक कुठून आले, यांना कोणी बोलावले, यामागचे संदर्भ काय, कोणाच्या ओळखीतून ते राजापूरमध्ये आले? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.
banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *