रत्नागिरी : जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींमधील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ, 10 हजार रुपयांपर्यंत मानधन

banner 468x60

गावचा गाडा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. यानुसार आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.

याचा लाभ जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे गावच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सरपंच गावाच्या ग्रामपंचायतीचा असतो. गावातील प्रमुख ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचांच्या हाती असतो. सरपंचाला ग्रामपंचायतीची कामे व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात. ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे, ग्रामसभा बोलावणे व त्याचे अध्यक्षपद भूषवणे.

सभेमध्ये पारित केले ठरावांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे, जमाखर्चाचे विवरण व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे अशी विविध प्रकारची सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचांची आहे.

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेत सरपंच उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ केली. ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे मानधन ३ हजार रुपयावरून ६ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच उपसरपंचांचे मानधन १ हजार रुपये होते आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला ते आहे.

२ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे मानधन ४ हजार रुपये होते ते आता ८ हजार रुपये करण्यात आले आहे. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारापेक्षा जास्त आहे. तेथील सरपंचांचे मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *