जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. आत्तापर्यंत सर्वाधिक गुहागर (४२.४३ टक्के) त्या खालोखाल रत्नागिरी (४०.१५ टक्के) तालुक्यात मतदान झाले.गुहागरमध्ये एकूण 56.52 टक्के मतदान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५६ गट आणि ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकासाठी शनिवारी सकाळी साडे वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, सुरूवातीपासून मतदानाला संथ प्रतिसाद होता. अनेक मतदान केंदांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने प्रक्रिया विस्कळीत झाली. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीलाही विलंब होत गेला.
शनिवारी सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत ११.२४ टक्के मतदान झाले. ११:३० वाजेपर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले. तर पुढच्या दोन तासांपर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदार आहेत. यापैकी दुपारी दीड वाजेपर्यंत ४ लाख ६३ हजार ९०४ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात महिला मतदारांची संख्या २,३७,७५३ तर पुरूष मतदारांची संख्या २, २६,१५० इतकी आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













