हर्णै बाजारपेठेत वाहतूक कोंडी, एसटी बस अडकल्यामुळे संताप

banner 468x60

हर्णै बाजारपेठेत रस्त्यालगत अनधिकृतरीत्या वाढवण्यात आलेल्या बांधकामांमुळे नेहमीच वाहतुकीचा खोळंबा निर्माण होतो. याच कारणामुळे काल (१७ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास एका एसटी बसला अडकण्याचा प्रकार घडला.


पर्यटकांची गर्दी, बाजारातील गोंधळ आणि अरुंद रस्ते यामुळे बस चालवणाऱ्या चालकाला अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. मेडिकलजवळ बस रस्त्यालगत बांधलेल्या पायऱ्यांच्या कडप्प्याला धडकली आणि पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. या घटनेनंतर काही वेळ बाजारात वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आणि किरकोळ बाचाबाचीही झाली.


या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, हर्णै ग्रामपंचायतीकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात येत आहे. वाढीव अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवावीत किंवा संबंधित दुकानदार व व्यापाऱ्यांना समज देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, अशा बांधकामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत आणि यामुळे केवळ एसटीच नव्हे, तर सर्वच वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. योग्य कारवाई झाल्यास वाहतूक सुरळीत होईल आणि पर्यटकांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *