मंडणगड तालुक्यातील चिचघर येथील प्रभूवाडी परिसरात रविवारी (१५ मार्च) सायंकाळी सुमारे ७:०५ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी तात्काळ माहिती दिल्यानंतर खेड अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने तातडीने बचाव व आग विझविण्याचे काम सुरू केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत गोठ्यातील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सुरेश शिगवण यांनी सहभाग घेतला. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली.

अग्निशमन दलाने मध्यरात्रीपर्यंत आग विझविण्याचे काम पूर्ण केले आणि पथक रात्री सुमारे १:०० वाजता अग्निशमन केंद्रात परतले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














