गुहागरच्या खेळाडूंची ‘किक बॉक्सिंग’मध्ये बाजी; 11 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य पदके पटकावली

banner 468x60

पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 19 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या 37व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कांस्य पदके पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.


​डॉ. योगिता खाडे आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. गुहागरच्या खेळाडूंनी विविध गटांमध्ये यश मिळवले.


​विजयी खेळाडूंची नावे
​7-9 वर्ष (मुले)
​रुद्र दत्तात्रय निंभोरे – किक लाईट प्रकारात सुवर्ण पदक
​अब्दुल्ला तंजीम माहिमकर – किक लाईटमध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक
​विहंग विक्रांत जानवळकर – किक लाईट प्रकारात सुवर्ण पदक
​मुहम्मद अम्मार घारे – किक लाईटमध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक
​10-12 वर्ष (मुली)
​हया ताहिर काझी – किक लाईटमध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक
​अहलाम ताहिर काझी – किक लाईटमध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक
​अन्वी विक्रांत जानवळकर – किक लाईट आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक
​गौरी दत्तात्रय निंभोरे – किक लाईट प्रकारात सुवर्ण पदक
​10-12 वर्ष (मुले)
​मेहराज मोजफ्फर अली – किक लाईट आणि लाईट कॉन्टॅक्ट या दोन्ही प्रकारांत सुवर्ण पदक
​13-15 वर्ष (मुली)
​मनाली संजय घाडीगांवकर – किक लाईट प्रकारात कांस्य पदक
​13-15 वर्ष (मुले)
​ताईब तंजीम माहिमकर – म्युझिकल फॉर्ममध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये रौप्य पदक
​दानिश लुकमान तडवी – किक लाईटमध्ये सुवर्ण आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये कांस्य पदक
​साइम सर्फराज मालगुंडकर – किक लाईट आणि लाईट कॉन्टॅक्टमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक
​या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे आयरे, हुजैफा ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक दिवेश वेद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शानदार कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *