गुहागर : महिलेची छेडछाड, सहा तासात आरोपी गजाआड, महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असणार्‍या कौंढर काळसूर रोडवर धक्कादायक घटना समोर आली आहे.

शृंगारी येथून धुनी भांडी आणि घरकाम करून कौंढर रस्त्याच्या मार्गे आपल्या घरी जात असताना तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घालून एका अनोळखी पुरुषाने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पलायन केले. ही घटना ४ डिसेंबर २०२४ दुपारी १ च्या सुमारास घडलीय.


पीडित फिर्यादी महिलेने तात्काळ गुहागर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केल्यामुळे अवघ्या सहा तासाच्या अथक प्रयत्नाने सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने गुहागर पोलिसांनी संशयित आरोपी संकेत सदानंद जाधव रा.नरवण (वय ३१) याला गुहागर येथुन अटक केली आहे.

फिर्यादी यांनी गुहागर पोलीस स्टेशन येथे त्वरित गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी भा.द.वि.कलम ७४,७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी संकेतला अटक करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास हे.कॉ. नलावडे करत आहेत.

आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक भोपळे, पोलीस हवालदार वैभव चोगले, कुमार घोसाळकर, प्रितेश रहाटे, प्रथमेश कदम यांनी कामगिरी बजावली. सध्या महिला सुरक्षित आहेत का? या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा ऐरणीवर असल्याचे बोलले जात आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *