गुहागर शहरातील वरचापाट मोहल्ल्यात गुरुवारी रात्री उशिरा एका ५५ वर्षीय पुरुषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
📌🎥 कोकणातील सर्व जलद बातम्या 📰 पाहण्यासाठी यूट्यूब YouTube SUBSCRIBE करा 👉🏻
https://youtube.com/@kokankattanews?si=-0uXXEV6pQgW6kb7
चाँदमियाँ शरफुद्दिन भाटकर (वय ५५ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते वरचापाट मोहल्ल्यातील त्यांच्या राहत्या घरात राहत होते. याबाबत माहिती देणारे देणारे बशिर अहमद शेखहसन बालाभाई, जे मृत व्यक्तीचे मावसभाऊ आहेत, यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता घरातील इतर सदस्य झोपले होते.
त्यानंतर रात्रीपासून ते १४ नोव्हेंबरच्या सकाळी सुमारे ८ वाजेपर्यंतच्या काळात चाँदमियाँ यांनी त्यांच्या बेडरूममध्ये लोखंडी रॉडला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
सकाळी घरच्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. तत्काळ याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर ही खबर गुहागर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली. माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक तपासानुसार हा गळफास घेऊन केलेला आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. तरीदेखील, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला आहे.
त्यांच्या अचानक केलेल्या या धक्कादायक निर्णयाने स्थानिकांमध्ये दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील तपास सुरू आहे . या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















