गुहागर : स्वरा संसारे आणि गार्गी चव्हाण यांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड”​

banner 468x60

​गुहागर : नंदुरबार येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या संघाने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

banner 728x90

या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गुहागर तालुक्यातील दोन सुकन्या कु. स्वरा सचिन संसारे (जानवळे) आणि कु.गार्गी अनंत चव्हाण (पाठपन्हाळे) यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

या निवडीमुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.​५ ते ७ डिसेंबर दरम्यान नंदुरबार येथे १९ वर्षांखालील मुलींची राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण २५ संघांनी सहभाग घेतला होता. डॉ. योगिता खाडे-आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने या स्पर्धेत आपला ठसा उमटवला.​

राज्यस्तरावरील या कामगिरीमुळे स्वरा आणि गार्गी यांची निवड १८ ते २१ डिसेंबर दरम्यान आग्रा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर आता त्या महाराष्ट्र राज्यासाठी मैदानात उतरणार आहेत.​

या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा आणि गुहागर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, उपाध्यक्ष खलील दलवाई, मंगेश माटे, गुहागर तालुका अध्यक्ष अॅड. संकेत साळवी, उपाध्यक्ष ओमकार संसारे, तसेच प्रणित सावंत, हुजैफ़ा ठाकुर, स्वप्निल धामणस्कर, कैलास पिलंकर आणि युवराज मोरे यांनी दोन्ही खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले असून राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *