गुहागर : समुद्रात बुडताना चार पर्यटकांचे प्राण वाचले, एकाची प्रकृती चिंताजनक

banner 468x60

गुहागर समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांना बुडताना स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाचविले. अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे हे पर्यटक अडचणीत सापडले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

banner 728x90 banner 728x90


या घटनेत एक पर्यटक गंभीर जखमी झाला असून अमोल मुत्ते राहणार मुंबई वय 42 यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी पर्यटकाला पुढील उपचारासाठी गुहागर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. दरम्यान, समुद्रातील धोकादायक प्रवाह आणि अचानक वाढणाऱ्या लाटांमुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *