गुहागर : पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी धार्मिक भावना दुखावल्या आरोप, बदली करण्याची मागणी, पण प्रकरण काय ?

banner 468x60

गुहागर तालुक्यातील अडूर गावातील बौद्ध विहारमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

banner 728x90

त्यांची बदली करावी अन्यथा २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असे निवेदन अडूर बौद्धजन सहकारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी पोलिसांनी सुमारे दीडशे लोकांना धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यास मज्जाव केला. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण यांच्याकडे तक्रार करण्यात आली;

परंतु या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्यादिवशी डिसेंबरला रात्री प्रतिवर्षीप्रमाणों बौद्ध विहारात मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी ग्रामस्थ विहाराजवळ एकत्र आले. या वेळी विहाराला कुलूप लावल्याचे आणि दोन होमगार्ड आणि प्रभारी पोलिसपाटील उपस्थित असल्याचे दिसले. याबाबत पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधला तेव्हा प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे कुलूप लावले आहे,

असे सावंत यांनी सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन गटांतील वादामुळे बंदोबस्त या संदर्भात पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी सांगितले, अडूर येथे अनेक वर्षापासून बौद्ध समाजात सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यावरून दोन गटात वाद आहेत.

दोन्ही गटाकडून सदर ठिकाणी कार्यक्रम करण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत एकमेकांविरोधात लेखी अर्ज पोलिस ठाण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच यापूर्वी वेळोवेळी पोलिस ठाणे स्तरावर बैठका घेऊन सदर वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *