शृंगारतळी (वार्ताहर) गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे कोंडवाडी चषकच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तळी मैदानात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या २ दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेत विशाखा स्पार्टन संघाने विजेतेपद तर श्री समर्थ कृपा संघाने उपविजेतेपद पटकावले. विठाई संघ तृतीय क्रमांकाचा संघ ठरला.
या तिन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत डिवाईन वॉरियर्स ( संघमालक मंगेश पागडे ), पिंट्या 11 ( संघमालक राकेश तेलगडे, दर्शन तेलगडे), विशाखा स्पार्टन ( संघमालक आशिष तेलगडे), त्रिमूर्ती ( संघमालक विजय पागडे, प्रितेश पागडे), श्री समर्थ कृपा ( संघमालक सागर पागडे), विठाई ( संघमालक ओंकार खैर, प्रथमेश गावडे) विप्रा 11 स्टार ( संघमालक विशाल घाणेकर ), गावडोबा 11 ( संघमालक अद्विक गावडे, आदित्य गावडे ), आमराई अव्हेंजर्स ( रोहित गावडे), के पी वॉरियर्स ( संघमालक महेंद्र पागडे, सुनील पागडे) या दहा संघाने सहभाग घेतला होता.
दोन दिवसीय स्पर्धेतील सामनावीर दिनेश तेलगडे, उत्कृष्ट फलंदाज दिनेश तेलगडे, उत्कृष्ट गोलंदाज आयुष घाणेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्चित तेलगडे, मालिकावीर सिद्धेश तेलगडे यांना गौरविण्यात आले.
पंच म्हणून अभिजीत पवार व सुमित टाणकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी सरपंच विजय तेलगडे, ग्रा. पं. सदस्य चंद्रकांत तेलगडे, दिनेश कदम, रामचंद्र तेलगडे, गणपत पागडे, शांताराम तेलगडे, पांडुरंग तेलगडे, हरीश्चंद्र तेलगडे, तुकाराम घाणेकर, चंद्रकांत गावडे, दिनेश तेलगडे, संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोंडवाडी चषकच्या मुलांनी विशेष परिश्रम घेतले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*