गुहागर : परचुरी येथे एसटी बस कलंडली

banner 468x60

गुहागर तालुक्यातील परचुरी येथे पांगरी सडेवाडी येथून विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे.


सदर बस परचुरी येथे आली असता चालकाचा ताबा सुटल्यामुळे एसटी बस ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात कलंडली .

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संकटकालीन मार्गाद्वारे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात चालक आणि ग्रामस्थांना यश आले आहे .यावेळी एसटी बस मध्ये 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *