पडवे जिल्हा परिषद गटातील पडवे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीकडून माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संघटनात्मक अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि पक्षनिष्ठा या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
माजी तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना निलेश सुर्वे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत भाजपच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे पडवे पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना निलेश सुर्वे यांनी पडवे गटातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.
“पक्षाच्या विचारधारेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, त्यांच्या उमेदवारीचे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















