गुहागर : जानवळे ओझरवाडीतील साकव वादात

Screenshot

banner 468x60

गुहागर तालुक्यातील जानवळे ओझरवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या साकव सध्या वादात अडकला आहे. या साकवाचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार का? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या साकवाकडे जाणाऱ्या रस्त्याची नोंद शासकीय दप्तरी २३ नंबरला कोठेही दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

banner 728x90

जानवळे ग्रामपंचायतीने मागणीचे पत्र किंवा प्रस्ताव पंचायत समिती किंवा जि. प. कार्यालयाकडे सादर केलेला नाही. या साकवापलीकडे लोकवस्ती आहे. परंतु तेथील पुढील रस्ता बंद आहे. मुख्य रस्ता जानवळे हेमंत हॉटेल ते साईबाबा मंदिर मार्ग शेजारी ओझरवाडी येथे जाण्या-येण्यासाठी व वाहतुकीसाठी साकव पलीकडून कुठपर्यंत जाणार आहे.

महसूल विभागामार्फत जो गट नंबर २४८ बिनशेती करण्यात येतो, त्याच्या जागेमधून वाट देणे बंधनकारक असते. मात्र, या लाभार्थी इतर लोकांना जागा देत नाही. नवीन शासन निर्णयाप्रमाणे पुढील घरासाठी किंवा वाडीतील लोकांसाठी जागा देणे बंधनकारक असतानाही त्यांना पायवाट दिली जात नाही. या प्रकरणी चौकशी करण्यात येऊन लेखी अभिप्राय कळवण्याची मागणी विनोद जानवळकर यांनी केली आहे. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *