गुहागर पंचायत समितीच्या दहा, तर जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने यश संपादन केले आहे. गुहागर पंचायत समितीमध्ये 9 सदस्य निवडून आल्याने युतीने आपली सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा परिषदेमध्ये युतीचे 3, उबाठाचा 1, मनसेचा 1, तर पं. समितीमध्ये युतीचे 9, उबाठाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे.
जि.प. गटनिहाय निकाल पाहा
कोंडकारुळ गटातून अपूर्वा अनीं बारगुडे, (भाजप, 5711 मते) घेऊन विजयी, तर मानसी मंगेश घाणेकर (उबाठा, 4580 मते) पराभूत, वेळणेश्वर गटातून नेत्रा नवनीत ठाकूर (शिवसेना, 7458 मते) विजयी, तर सिद्धी संतोष रामगडे (उबाठा, 3241 मते) पराभूत, पडवे गटातून महेश राघू नाटेकर (शिवसेना, 5975 मते) घेऊन विजयी, तर सचिन चंद्रकांत बाईत (उबाठा, 5614 मते), शृंगारतळी गट- प्रमोद सीताराम गांधी (मनसे, 6158 मते) घेत विजयी, डॉ. राजेंद्र विष्णू पवार (भाजप, 3987 मते) पराभूत, जि. प. असगोली गटात विक्रांत भास्कर जाधव (उबाठा, 6515 मते) विजयी, तर संतोष लक्ष्मण जैतापकर (शिवसेना, 4522 मते), फरहान नजी खान सरगुरो (राष्ट्रवादी काँग्रेस, 152 मते), अरुण महादेव भुवड (अपक्ष, 138 मते) हे पराभूत झाले.
पंचायत समिती गणनिहाय निकाल पाहा
मळण गणातून मानसी मंगेश सांगळे (भाजप, 2599 मते) विजयी, तर साक्षी शेखर चव्हाण (उबाठा, 2521 मते) पराभूत, कोंडकारूळ गणातून प्रणव प्रमोद पोळेकर (शिवसेना, 3292 मते)- विजयी, महेश सुरेश गोवळकर (उबाठा, 1843 मते) पराभूत, वेळणेश्वर गणात संदीप हरिश्चंद्र गोरिवले (शिवसेना, 3458 मते)- विजयी, तर सचिन श्रीधर जाधव (उबाठा, 1677 मते), शीर गणात स्नेहा दिनेश शिगवण (भाजप, 3362 मते) विजयी, तर ॲड. ज्योत्स्ना विनय कातळकर (उबाठा, 2134 मते) पराभूत, पडवे गणात नीलेश विश्वनाथ सुर्वे (भाजप, 2945 मते) विजयी, तर रवींद्र पांडुरंग आंबेकर (उबाठा, 1948 मते), आनंद गोविंद भोजने (अपक्ष, 883 मते) पराभूत, पाचेरीसडा गणात सुचिता दत्ताराम घाणेकर (शिवसेना, 3000 मते) विजयी, तर शशिकला रामचंद्र मोरे (उबाठा, 2838 मते) पराभूत, तळवली गणात मंगेश गंगाराम जोशी (भाजप, 2515 मते) विजयी, तर संतोष पांडुरंग जोशी (राष्ट्रवादी, 431 मत), रियाज हुसैन ठाकूर (काँग्रेस, 94 मते), संदीप शांताराम धनावडे (उबाठा, 2204 मते), सखाराम लक्ष्मण पवार (बहुजन समाज पार्टी, 195 मते) हे पराभूत, शृंगारतळी गणात गौरव सुशील वेल्हाळ (शिवसेना, 2792 मते) विजयी, तर संजय तात्याबा पवार (उबाठा, 1887 मते) पराभूत, अंजनवेल गणात सारिका सचिन दाभोळकर (शिवसेना, 2639 मते) विजयी, तर प्राजक्ता प्रवीण जांभारकर (उबाठा, 2290 मते), भक्ती वैभव बने(राष्ट्रवादी काँग्रेस, 103 मते) हे पराभूत, असगोली गणातून पूर्वी उमेश खैर (उबाठा, 4002 मते) वजयी, तर पूनम उदय रावणंग (शिवसेना, 1713 मते), श्रावणी सुजित शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, 1713 मते) हे पराभूत झाले. पाच जिल्हा परिषद गटामध्ये भाजप 1, शिवसेना 2, उबाठा सेना 1 व मनसे 1 असे बलाबल आहे. यावेळी तालुक्यातील मनसेने प्रमोद गांधी यांच्यारूपाने जि.प.मध्ये खाते खोलले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















