Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

गुहागर : दारूच्या नशेत गोंधळ घातला, ग्रामीण रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न

banner 468x60

दारूच्या नशेत कर्मचाऱ्याने रुग्णालयात गोंधळ घालून अंगावर सॅनिटायझरची बाटली ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शनिवारी दुपारी गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडला. रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला राेखल्याने पुढील अनर्थ टळला.

banner 728x90 banner 728x90


याप्रकरणी रवींद्र भागाेजी जाधव (वय ४०, रा. ग्रामीण रुग्णालय क्वार्टर, गुहागर) या कर्मचाऱ्याविराेधात गुहागर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविराेधात डाॅ. जयपाल रघुनंदन ढाले (३०) यांनी फिर्याद दिली आहे.

डाॅ. जयपाल ढाले हे शनिवारी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असताना दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी रवींद्र जाधव दारू पिऊन आला. त्याने दारूच्या नशेत डाॅ. ढाले यांच्यावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच गैरशिस्तीचे वर्तन करून रुग्णालयात गाेंधळ घातला.

त्याचबराेबर त्याने कार्यालयातील सॅनिटायझरची बाटली अंगावर ओतून ‘मी इथेच जीव देऊन तुमची सर्वांची नावे लिहीन,’ अशी धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच राेखल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पाेलिसांनी रवींद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पाेलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *