गुहागर तालुक्यातील चिखली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल गोपाळ कानसे (वय ३५, रा. चिखली मांडवकरवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कानसे याने चिखली येथील औकार मंगल कार्यालयाच्या किचनमधील सीलिंग फॅनच्या हुकला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















