गुहागर :बळीराज सेना युवा नेते ऍडव्होकेट विनेश अशोक वालम कोकण दौऱ्यावर

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी ) बळीराज सेना युवा नेते ऍडव्होकेट विनेश अशोक वालम हे दिनांक 8,9 व 10 फेब्रुवारी 2025 रोजी कोकण दौऱ्यावर येत असल्याची माहिती बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी आज दिली.

बळीराज सेना पक्ष बांधणी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यासाठी हा संपर्क दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे संगमन्यात आले.

दरम्यान या वेळी पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी शरद बोबले,संतोष निवाते, विनेश वालम यांचे सोबत रहाणार आहेत.

नियोजन नुसार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी चिपळूण तालुका भेटीगाठी. 9 फेब्रुवारी रोजी गुहागर तालुका तर 10 रोजी खेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी व पक्ष वाढीसाठी महत्वाची चर्चा विनेश वालम व अन्य पदाधिकारी करणार आहेत.

त्यांचे या दौऱ्यामुळे बळीराज सेनेच्या कार्यकर्ते मध्ये उत्साह निर्माण झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *