गुहागर : अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करीचा माल जप्त

banner 468x60

गुहागर तालुक्यातील अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी मध्यरात्री 1 ते 3 या वेळेत मोठी कारवाई करून यामध्ये 2 करोड 5 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

गुहागर पोलीस अंजनवेल येथे गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती. अंजनवेल जेटी किनारी रात्री १ ते 3 या दरम्यान अवैधरित्या एका मच्छिमारी बोटीतुन जीवनावश्यक वस्तू, डिजेल टँकरमध्ये मोटर व पाईपच्या सहाय्याने 9 व्यक्ती अवैध रित्या डिझेल तस्करी करीत असताना मिळून आले.

या डिझेल तस्करीकरिता वापरण्यात आलेली, मच्छिमारी बोट, बोटीवरील मोटर व पाईप, टँकर MH ४६ BM ८४५७, बलेनो कार MH ४६ BK २५६८, मच्छिमार बोटीतून मोटर व साहित्य यांच्या सहाय्याने २५००० लिटर डिझेल तसेच आरोपीच्या ताब्यातील नऊ मोबाईल गुहागर पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण २,०५,९५, ००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, एलसीबीचे पोलीस निरीक्षक ढेरे, गुहागर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सचिन सावंत व कर्मचारी, तालुका पुरवठा अधिकारी पेंडसे यांनी केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *