गुहागर : 60 वर्षात चाळे करणाऱ्या सासऱ्याला गावातून हद्दपार, सासऱ्यामुळे झालं गावाचं नाव खराब, सरपंचांच्या निर्णयाचे कौतुक

Screenshot

banner 468x60

गुहागर तालुक्यामधील झोंबडी गावामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सासऱ्याने नवविवाहीत सूनेवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक झालेल्या विजय शांताराम सकपाळ याला गावातून हद्दपार करण्यात यावी, असा एकमुखी ठराव झोंबडी ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आला.

banner 728x90 banner 728x90

सरपंच अतुल लांजेकर यांनी याबाबत घेतलेल्या पुढाकारचे सर्वांनी कौतुक केले आहे. तसेच यापुढे गावात अशाप्रकारचे कृत्य कोणी केल्यास तशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे. झोंबडी येथील विजय शांताराम सकपाळ या साठ वर्षीय इसमाने आपल्याच २१ वर्षीय सुनेचा सातत्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

सुनेने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गुहागर पोलीस स्थानकात २५ रोजी सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल होवून दोन दिवस उलटून गेले तरी संबधीत इसमाला पोलीसांनी अटक न केल्याने गुहागर तालुका राष्टवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होतं याचा जाब गुहागर पोलिसांना विचारल्यानंतर आरोपी सकपाळ याला अटक करण्यात आली.

दरम्यान, हि घटना अतिशय चीड व संताप आणणारी असून सदरच्या घटनांवरून नराधम सासऱ्याने सुनेच्या एकांताचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा प्रकारच्या व्यक्तीमुळे आपल्या गावाची बदनामी होते म्हणून झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर यांनी (शुक्रवार दि. 30) रोजी सकाळी 11.30 वाजता झालेल्या ग्रामसभेत हा विषय उपस्थित केला.

आपल्या कुटुंबातीलच महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला गावात राहण्याचा कोणताच अधिकार नाही. अशा माणसामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. तसेच गावातील महिला असुरक्षित वाटू नये.

म्हणून सदरील व्यक्तीला गावातूनच हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ज्या प्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला जिल्ह्यातून तडीपार केले जाते त्याच पद्धतीने सकपाळ यांना देखील गावातून हद्दपार करावे, अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी पाठिंबा देत तशा प्रकारचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *